भिंगारमधील नेहरू मार्केटला आग...

नगर  -  भिंगार छावणी परिसरात सदर बाजार लगत असलेल्या नेहरू मार्केटला भीषण आग लागली. या आगीत नेहरू मार्केटमधील चोवीस पैकी तब्बल वीस दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. 


आग विझवण्यासाठी महानगरपालिका, एमआयडीसी, राहुरी, व्हीआरडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली. आग पहाटेच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. मात्र धुराचे लोट दिसून येत होते.


आमदार संग्राम जगताप यांनीही भिंगार येथील नेहरू मार्केटला आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पोहचण्यासाठी सूचना दिल्या. 

या आगीत मोठी वित्तहानी झाली असून संबंधितांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post