नगर : एका अधिकार्याला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व अधिकारी एकत्र येत संबंधितावर कारवाई करावी यासाठी लढा दिला. त्यामुळे सर्वजण एकच आहेत. हे यातून दिसले एकीकडे असे चित्र दिसत असतात याच जिल्ह्यात एका वरिष्ठाने कनिष्ठाला घरीजाऊन शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर पोहचल्यानंतर माफी मागून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याची जिल्हाभर चर्चा सुरु झालेली आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वी एका अधिका-याने आपल्या कर्मचाऱ्यांला रात्रीच्या वेळी घरी जाऊन शिवीगाळ केली. त्यामागे कारण वेगळेच होते. संबंधित कर्मचार्याला एका प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पुन्हा कारवाई करू नये, असे सूचित केले होते.
कारवाई करा व नका करू हे दोन्ही आदेश तोंडीच होते. त्यामुळे संबंधित कर्मचार्याला नेमकं काय करावे हेच उलगड नव्हते. त्यामुळे त्या कर्मचार्याने त्या प्रकरणात कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी त्या कर्मचार्यावर संतप्त झाले. त्यांनी त्या कर्मचार्यावर कारवाईचा प्रस्ताव करून तो वरिष्ठ कार्यालयाला पाठविला.
वरिष्ठ कार्यालयाने त्या प्रस्तावावर संबंधित कर्मचार्यांकडून खुलासा मागितला. त्या कर्मचार्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या खुलाशात देऊन आपण निर्दोष असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यात म्हटले. ही सर्व बाब त्या अधिकार्याला समजल्यानंतर त्याने वेळ काळ न पहाता त्या कर्मचार्यांचे घर गाठून त्याला शिवीगाळ केली. रात्रीच्या वेळी वरिष्ठाने आपल्याला शिवीगाळ केल्याची सल त्या कर्मचार्याच्या मनाला लागली होती.
रात्रीच्या शिवीगाळ प्रकरणाची चर्चा थेट संघटनेच्या पदाधिकारी यांपर्यंत पोहचली. जिल्हास्तरावरून या घटनेचे पडसाद उमटू लागल्यानंतर ते वरिष्ठ अधिकारी भानावर आले. त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी काहींना पुढाकार घ्यायला लावून त्या कर्मचाऱ्याचा भेट घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्या दोघांची भेट होऊन संबंधित अधिकार्याने त्या कर्मचाऱ्याचा माफी चार भिंतीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत मागून झाले गेले विसरून जाऊ असे यावेळी ठरले. मात्र या चार भिंतीत झालेल्या माफीनाम्याची जिल्हा भर चर्चा रंगली आहे.
पहिल्याचा लाथ मारायची व नंतर पाया पडयाचे या म्हणी सारखा हा प्रकार झालेला आहे. या अगोदरही त्या अधिकार्याकडून कर्मचार्यांना शिवीगाळ सारखे प्रकार झालेले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
अधिकारी धालो म्हणून कर्मचार्यांना आपण कसेही वाकवू शकत नाही. बाहेरील व्यक्तींपेक्षा आता वरिष्ठांना अधिकार्यांना कर्मतार्यांशी कसे बोलावे याचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे.
जे कर्मचार्यांशी अरेरावीने बोलतात ते सर्वसामान्यांनी कसे बोलत असतील, अशी चर्चा आता कर्मचारी यामध्ये सुरु झालेली आहे.
Post a Comment