नेवासा : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेस ध् घवघवीत यश मिळवत नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा याठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे किशोर जाधव यांची नुकतीच निवड झाली.
याबाबत एमपीएससीमार्फत अधिकृत निवड पत्र नुकतेच जाहीर करण्यात येऊन त्यांच्या नावाची शासनाकडे शिफारस करण्यात आली. नेवासा तालुक्यातील खामगाव हे मूळ गाव असणारे किशोर जाधव हे २००५ सालापासून प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत.
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षक म्हणून काम करताना शिष्यवृत्ती परिक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. त्यांच्या पत्नी चित्रा गायकवाड या ही प्राथमिक शिक्षिका म्हणून नेवासा तालुक्यातील खूपटी येथे कार्यरत आहेत.
जाधव यांनी पाथरवाला ( खाटीक वस्ती ) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उत्कृष्ठ काम केल्यानंतर नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा या ठिकाणी सध्या उत्कृष्टपणे सेवा करत आहेत. शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थी घडवण्याचे काम प्रामाणिकपणे करत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्याने चालू ठेवून हे घवघवीत यश मिळवले.
सातत्य, चिकाटी, व्यायाम या गोष्टींना महत्त्व देत हे यश संपादन केले आहे. यापुढील काळामध्ये पोलिस विभागाबाबत सर्वसामान्यांची असणारी नकारात्मक भूमिका पुसून काढण्याचे काम करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल दिनकर टेमकर , संचालक महाराष्ट्र राज्य पुणे , रूपेश कुमार सुराणा, तहसिलदार नेवासा,शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक ), रामदास हराळ शिक्षणाधिकारी (माध्यमिक ), शेखर शेलार गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा, त्याचबरोबर विलास साठे उपशिक्षणाधिकारी, सुलोचनाताई पटारे -पुरनाळे गटशिक्षणाधिकारी ,शिवाजी कराड विदयादेवी सुंबे, रेणुका चंन्ना विस्ताराधिकारी व सर्व शिक्षण विभाग यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच रावसाहेब पाटील कांगुणे, सभापती पंचायत समिती नेवासा, किशोर जोजार, उपसभापती पंचायत समिती नेवासा, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षक नेते संजय कळमकर, शिक्षक समिती जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ बेहेळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment