पाथर्डी : जिल्ह्यामध्ये मोठयाप्रमाणात केंद्राकडुन निधी आणून इतिहासामध्ये नोंद होईल. असे उडडाणपूल, राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे मार्गी लावली. राज्यात आम्ही १०६ असून विरोधात बसलो. परंतु कधी जाहीरात केली नाही. आघाडीचे नेते मी किती साधा, सरळ, समाजसेवक व खरा आहे, हे दाखवत उठता बसता सोशल मीडियावर जाहिरात करत जिल्हाभर फिरत असल्याची टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
कोरडगाव येथे आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनेच्या आढावा बैठकीत खासदार डॉ. विखे बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, अजय रक्ताटे, सरपंच विष्णू देशमुख, सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायण काकडे, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, नायब तहसिलदार पंकज नेवसे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षाच्या काळात काहीच काम केले नाही. मात्र कोरोना काळात समाजाला मदत करणाऱ्या आमच्या सारख्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्यायाचे काम केले.
राज्यात सध्या विचित्र पध्दतीने काम सुरु असुन जिल्हयातील काही नेते उठता बसता सोशल मिडियावर फोटो टाकत आहे. आता फक्त आंघोळ करतांना फोटो टाकायचे बाकी राहिले असल्याचे टीका यावेळी त्यांनी केली.
विकासची कामे आम्ही अनेक पिढयापासून करत आहोत. कोरोनामुळे केंद्रसरकारकडून कमी निधी मिळाल्याने विकास कामांना वेग देता आला नाही.
मात्र यापुढे जिल्ह्यातील सर्व कार्यालयामार्फत कुठल्याही मागणीवर ३० दिवसामध्ये कारवाई करुन लेखी स्वरुपात माहिती सबंधितांना देण्याची व्यवस्था केलेली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी केली कोणी काही टीका केली तरी विकासकामे आणि जनतेची कामे ही करणारच असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी परिसरातील अनेक कुटुंबातील जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया झालेल्या कुटुंबाच्यावतीने खा. डॉ. विखे यांचा सत्कार करण्यात आला. अजय रक्ताटे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
Post a Comment