पारनेर : आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान अध्यक्ष जितेश सरडे वाढदिवस साजरा करणार आहेत.
आमदार निलेश लंके यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालणारे आम्ही कार्यकर्ते असून लोकनेत्यांचा वारसा भक्कमपणे चालविण्यासाठी सर्वच कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचा संदेश यातून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते देणार आहेत, असे जितेश सरडे यांनी सांगितले.
पाच जुलैला साजरा होणाऱ्या जितेश सरडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने कान्हूर पठार, देवीभोयरे, देवीभोयरे फाटा या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच पाचशे फळझाडे वाटप करण्यात करण्यात येणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदर्शावर पाउल ठेऊन व लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या शिकवणीनुसार सर्व कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत.
याचाच एक भाग म्हणजे जितेश सरडे यांचा साजरा होणारा वाढदिवस आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment