पारनेर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसाहित पारनेर व नगर तालुक्यात 2019-20 या वित्तीय वर्षात बॅच दोन अंतर्गत पारनेर तालुक्यात ११ कोटी ९३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधानसभा माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी दिली.
औटी म्हणाले की, सात जून २०१९ रोजी मी विधानसभा उपाध्यक्ष असताना तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली याचे साक्षीदार तालुक्यातील जनता आहे.
मुख्य ग्रामसडक योजने अंतर्गत तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. एशियन बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन २०१८ पासून तालुक्यातील सहा गावांचे प्रस्ताव ग्रामसभा ठराव ग्रामसभेमध्ये त्याची मांडणी केली.
त्यानंतर कोल्हापूर येथील एजन्सी निवडून त्याचा सर्वे झाला. या रस्त्यांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्याने घेतले त्यामुळे बँकेच्या सर्व बाबींचा राज्य शासना बरोबर करार पूर्ण करून अर्थसहाय्य उपलब्ध झाले.
त्यानंतर टेंडर प्रोसेसिंग व आता प्रत्यक्षात कार्यरंभ आदेश मिळाला याचे मनस्वी समाधान मला आहे. पारनेर तालुक्यात जवळपास १२ कोटी व त्याच बरोबर नगर तालुक्यात देखील ४ कोटी २४ लाख २६ हजार रुपयांचे रस्ते असे एकूण पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात १६ कोटी १७ लाख ५७ हजार रुपयांचा निधीचा कार्यरंभ आदेश मिळाला याचे समाधान आहे.
सरकार शिवसेनेचे आहे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामे मोठया प्रमाणात मार्गी लागतील. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून काशीनाथ दाते व सभापती गणेश शेळके यांची विकासाची घोडदौड चालूच आहे.
शिवसैनिक वाऱ्यावर सोडणार नाही अविरत त्यांच्यासाठी काम करणार आहे. विकासाची परंपरा खंडित होऊ देणार नाही.
पारनेर तालुका
मावळे वाडी ते गावठी वस्ती रस्ता ४ किलोमीटर एकूण निधी २ कोटी ७९ लाख ८९ हजार, अस्तगाव धोकटी ते आमले वस्ती रस्ता २.२० किलोमीटर एकूण निधी १ कोटी ५० लाख ६ हजार, जामगाव ते सारोळा अडवाई रस्ता ३.३० किलोमीटर एकूण निधी१ कोटी ८२ लाख १५ हजार, जामगाव माता साठे वस्ती ते लोणी हवेली रस्ता ३.३३ किलोमीटर एकूण निधी १ कोटी ८६ लाख ६६ हजार, राष्ट्रीय महामार्ग५८ ते हनुमान वाडी रस्ता २.३८ किलोमीटर एकूण निधी १कोटी ५८ लाख २७ हजार, राष्ट्रीय महामार्ग २२२ ते धोत्रे खुर्द रस्ता ३.५० किलोमीटर एकूण निधी २ कोटी ३६ लाख २८ हजार
नगर मतदारसंघ
कामरगाव ते विठ्ठलवाडी रस्ता ३.३० किलोमीटर एकूण निधी २ कोटी २४ लाख ७१ हजार, निमगाव वाघा ते कापसे वस्ती रस्ता १.३५ किलोमीटर एकूण निधी ९२ लाख ९६ हजार, सारोळा कासार ते दरेमळा रस्ता १.७०किलोमीटर एकूण निधी १ कोटी ६ लाख ५९ हजार
Post a Comment