पारनेर आगारातील सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आमदार नीलेश लंके यांच्याकडून सन्मान !


पारनेर : सर्वसामान्य जनतेची जीवनदायिनी समजली जाणारी लालपरी म्हणजेच एसटी. या परिवहन विभागात प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाबद्दल पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एसटी आगारात जाऊन सदर कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कौतुक करत मतदार संघाचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचा यथोचित सन्मान केला.

पारनेर आगारातील वाहतूक नियंत्रक दत्तात्रेय शेळके, अरुण पवार, कार्यशाळेतील मुख्य तंत्रज्ञ श्रीराम काळे, चालक अप्पासाहेब लटांबळे, सुभाष करकंडे, मोहन औटी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभात आमदार लंके यांनी सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांचे अभिनंदन केले .            

यावेळी आमदार लंके यांच्या माजी सभापती सुदाम पवार, युवा नेते बाळासाहेब औटी सर, बलभीम कुबडे, श्रीकांत चौरे, आगार प्रमुख सतिश कांबळे, बी. के.  मस्के, सुरेश औटी, दिगंबर अडसूळ आदी उपस्थित होते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन  सन्मान करण्यात आला. पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

तालुक्यातील प्रत्येक गावात विद्यार्थ्यांच्या शाळा, महाविद्यालयांच्या वेळेनुसार एसटीची सेवा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुकर झाले. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम केले.

तालुक्यातील दैनंदिन जडणघडणीत एसटी  कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. एसटीची सेवा उपलब्ध नसती तर ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थीनींना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागले असते असे आ.लंके यांनी सांगितले .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post