पारनेर ः पारनेर बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज (रविवारी) झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक 2000 रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत सहा हजार 533 कांदा गाेण्यांची आवक झाली हाेती. यामध्ये एक नंबर कांद्याला 1900 त 2000, दाेन नंबर कांद्याला 1500 ते 1800, तीन नंबर कांद्याला एक हजार ते 1400, चार नंबर कांद्याला 300 ते 900चा प्रतिक्विंटल भाव मिळाला.
शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.
कांद्याला मागणी कमी असल्यामुळे भाव कमी मिळत आहे. कांद्याला मागणी वाढल्यानंतर भावात वाढ होईल, अशी आशा शेतकर्यांना लागली आहे.
Post a Comment