साईनाथ शुगरने थकविले कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे...क्रांतीसेनेचे श्रीगोंदा तहसीलदार यांना निवेदन


श्रीगोंदा : तालुक्यातील उक्कडगाव येथील साईनाथ शुगरने  थकविलेले कर्मचार्यांचे वेतन द्यावे, या.मागणीचे निवेदन नायब तहसीलदार चारुशिला पवार यांना क्रांती सेनेतर्फे देण्यात आले.

साईनाथ शुगरने कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याची तक्रार क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर व शेतकरी तालुकाध्यक्ष वैभव जाधव यांच्याकडे केली होती. 

या तक्रारीची दखल घेत जिल्हाध्यक्ष दरेकर व तालुकाध्यक्ष जाधव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांचे थकित पगार लवकरात लवकर मिळावेत,अशी मागणी केली आहे. 

या कंपनीतील कामगारांना नोव्हेंबर महिन्यापासून पगार देण्यात आले नाहीत. या कारणास्तव कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांना पगार न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. 

याबाबत कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीच्या कर्मचार्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करत सहकार्य करावे, अशी विनंती करत आज तहसील कार्यालयात एकत्रित येत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

लवकरात लवकर पगार न झाल्यास कंपनीच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी डफले बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी सुभाष दरेकर,वैभव जाधव,अनिकेत सोनवणे, संजय पवार, साहेबराव लबडे, भरत मडके, अविनाश लगड,शरद मांडे, दीपक ढवळे, शिवाजी देशमुख,अनिल ढवळे, अक्षय भोंडवे, शिवाजी अडागळे, आशिष शेलार, संतोष भोस, सनी अडागळे, संजय शिनवरे, समीर सय्यद, भिवसेन मदने, अक्षय बडवे, जालिंदर कुदांडे, सयिस शेख, दत्तात्रय निंबाळकर, रमेश चौधरी, सुदाम सांगळे, रोहिदास लगड, दिलीप शेलार, गुलाबराव लोंढे, योगेश गोरणे, पवन आवताडे, अशोक रहाणे, दिपक साळवे, त्रिंबक साळवे, संजय लांडे, तुळशीराम अडागळे, संदीप ढवळे, प्रविण म्हस्के आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post