पाथर्डी : विकास कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांची उदासीनता शहरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही दुर्लक्ष,आढावा बैठकीला दांड्या मारता तुम्हाला आढावा बैठक म्हणजे पोरखेळ वाटला काय. काम करायचे नसेल तर सक्तीच्या रजेवर जा. नाहीतर बदल्या करून जा. अतिक्रमणांच्या विषयांसह अन्य विषयावरून आमदार मोनिका राजळे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.
तहसील कार्यालयाच्या सभागृहात सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक आमदार राजळे यांनी निमंत्रित केली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार शाम वाडकर, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, तालुका कृषि अधिकारी प्रवीण भोर, वनक्षेत्रपाल शिरीष निरभवणे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, डॉ. अशोक कराळे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड, सोमनाथ खेडकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, जि.प.सदस्य राहुल राजळे, पं.स.गटनेते सुनील ओव्हळ, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, रविंद्र वायकर, सुनिल परदेशी, नगरसेवक अनिल बोरुडे, नामदेव लबडे, महेश बोरूडे, मंगल कोकाटे, रमेश हंडाळ, भाजपा माहिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीताई गोल्हार, भगवान आव्हाड, संतोष दहिफळे, दत्तू पठाडे, भगवान साठे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, पांडुरंग लाड, जमीर आतार, बाळासाहेब गोल्हार, आदिनाथ धायतडक, युसुफ शेख, नारायण पालवे, अभिजीत गुजर आदी उपस्थित होते.
सरपंच अविनाश पालवे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, जमीर आतार, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, महेश बोरुडे, अजय भंडारी आदींनी शहरातील अतिक्रमणाच्या विषयासह तालुक्यातील प्रशासनातील अधिकाऱ्यांची कार्यपद्धती पाहून सुरवातीला शांतपणे ऐकून घेणाऱ्या आमदार अतिक्रमणाचा विषय निघताच त्यांची सहनशीलता संपून त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना धारेवर धरले.
गेल्या सहा महिन्यापासून शहरातील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडी आदी विषयावरील चर्चा खूपच तापली.
आमदार राजळे म्हणाल्या बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष मात्र बांधकाम परवानगी मागणाऱ्याला हेलपाटे मारायला लावता. आमदारांनी सांगून सुध्दा दुर्लक्ष करता.
अतिक्रमणे हटवायला कुणाला घाबरता. शहरात फिरणे अवघड होऊन त्रस्त नागरिक शिव्या घालतात. पालिकेचा धाक उरला नसून लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.
शहरात जागा धरणे एक दोन पाण्याचे जार ठेवणे वडापाव मांडला की झाले दुकान. जागा धरणे हा धंदा झाला आहे. सर्व व्यवसायिक बाजार तळावर हलवा रस्ते मोकळे करा.
व्यापाऱ्यांच्या दुकाना पुढे कोणीही बसते बाजूला हटविण्यासाठी पैसे मागतात चाललय काय शहरात कोरोनाच्या नावाखाली.कार्यालयात यायचे नाही. अधिकारी,पदाधिकारी बैठका बंद झाल्या योजनांची माहिती अहवाल द्यायचा नाही. परस्पर नको ते उद्योग करायचे.
वेळकाढूपणा करून चुकीची माहिती बैठकीत देऊ नका. गैरवर्तन करणाऱ्या कुणावरही कारवाई करायची नाही, असे अधिकाऱ्यांनी ठरवले असेल तर तसे सांगा माझ्या पद्धतीने बंदोबस्त करता येईल.
प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तरी काय केले प्रशासकीय प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडा. पालिकेतील विभाग प्रमुखांचे टेबल बदला वर्षानुवर्षे एकाच जागेवर काम करून हितसंबंध निर्माण झाले आहेत.
पदाधिकाऱ्यांवर उपोषणाची वेळ येऊ देऊ नका. जॉगिंग पार्क चा रस्ता बंद केला असेल तर त्याबाबत पाहणी करा. अतिक्रमणाच्या बाबतीत महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग,पंचायत समिती विभाग परस्परावर जबाबदारी ढकलत असेल तर सर्व विभाग महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील आहेत सर्वांनी आपली हद्द निश्चित करून महसूल प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
कागदी खेळ व आकडयांचा मेळ जुळवू नका.बाजारतळ परिसरातील पंचायत समिती रस्त्याची जागा महसूल विभागाची असेल तर ती मोकळी करा. नकारात्मक उत्तरे देऊन जबाबदारी झटकू नका. बैठकीला पोलिस निरिक्षक भुमिअभिलेख, सामाजिक वनीकरण आदी जबाबदार अधिकारी गैरहजर आहेत त्यांची नोंद घेतली आहे.
शहरातील अवैध धंदे सर्रास सुरू असून पोलिस खात्याचा सावळागोंधळ सुरू आहे. गुन्हेगारांचा सन्मान व लोकप्रतिनिधींचा अपमान अशी.पोलिसांनी कार्यपद्धती बदलावी गुन्ह्यांचा तपास नाही. शहरात सुरळीत चालता येत नाही एवढी वाहतूक कोंडी असून पोलिस काय करतात. वन विभागाचे काय चालले कोणालाच कळत नाही.कागदावरच वृक्षारोपण न करता सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे करा.
राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारासह बैठक घेऊन शहराच्या प्रश्नासह टाकळी फाट्यापर्यंत खड्डे बुजवावीत. संजय गांधी निराधार योजना बाबत तालुक्यातील विशिष्ट भागातील प्रकरणांना झुकते माप दिले जात असल्याबद्दल तहसीलदारांना समज देत आमदार राजळे म्हणाल्या तुम्ही राहुरी तालुक्यातील रहिवासी असला तरी राहुरी, पाथर्डी, नगर असा मतदार संघ आहे. जरा उर्वरित भागाकडे लक्ष द्या.
त्यावर तहसीलदारांनी अप्रत्यक्षपणे राज्यमंत्र्यांच्या आदेशाकडे लक्ष वेधून स्वतःची सुटका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून तहसीलदार शाम वाडकर यांनी आभार मानले.
Post a Comment