संगमनेर : ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्प भूमी पेमगिरीतील अनेक तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
राज ठाकरे यांच्या विचारांनी आज महाराष्ट्रातील अनेक तरुणांना भुरळ घातली आहे.मराठी मनाचा ठाव घेणारं तसेच निर्भीड, सडेतोड व रोखठोक विचार मांडणारे तसेच भविष्याचा अचूक वेध घेणारं व्यक्तीमत्व म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील युवक त्यांच्याकडे बघतात.
मराठी भाषेसाठीही त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे अनेक तरुणांनी त्यांच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी संगमनेर महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष संकेत लोंढे, शहराध्यक्ष प्रमोद काळे, जेष्ठ नेते मनसेचे माजी शहरप्रमुख अभिजीत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी संकेत लोंढे म्हणाले की, लवकरच संगमनेर तालुक्यातील पहिली मनसेची शाखा पेमगिरीत सुरु करणार आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण अन्याय दिसेल तेथे न्याय करण्यासाठी प्रयत्न करू.
तसेच शहागड व महावटवृक्ष संवर्धनासाठी व विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याच आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रम प्रसंगी पेमगिरीतील मनसैनिकांमध्ये सुरज डुबे, धनंजय नरवडे, अक्षय गोडसे, चैतन्य डुबे, संकेत गोडसे, अनिल डुबे, प्रवीण डुबे, सुनील डुबे, संकेत पावसे, सागर गोडसे, राजू गपले, विक्रम डुबे, स्वप्नील डुबे, अक्षय चव्हाण, अजित कोल्हे, विक्रम कोल्हे, संदीप वाकचौरे तसेच पेमगिरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment