राहाता : तालुक्यातील चितळी येथील एक 24 वर्षीय तरुणाने आपल्या घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी समाज माध्यमावर संदेश टाकला होता.
एका पोलिस कर्मचार्याने आपल्या माणसांद्वारे छळ केल्याने आपण आत्महत्या करत असल्याचा संदेश या तरुणाने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडली आहे.
सुजीत बाबासाहेब चौधरी असे आत्महत्या केेलेल्या तरुणाचे नाव आहे. काल सायंकाळी सुजीत घरातून बाहेर गेला. उशिरापर्यंत तो परत आला नाही, म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला असता घराजवळच्या विहिरीजवळ त्याचा मोबाईल आढळून आला.
दरम्यान त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून एका पोलिस कर्मचार्याचे नाव घेऊन हा कर्मचारी त्याच्या माणसांद्वारे आपला छळ करीत आहे. त्याच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश समाज माध्यमावर व्हायरल केला.
या घटनेमुळे पोलिस दलात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील त्या पोलिस कर्मचार्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Post a Comment