पेमगिरीतील शहागडावर खा.विखेंच्या हस्ते वृक्षारोपण...!


संगमनेर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी  पेमगिरीत नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी शहागडावर विविध प्रकारच्या वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागविल्या.

बालपणी पेमगिरीतील सीताफळे आवडीने खाल्याची आठवण त्यांनी यावेळी पेमगिरीकारांना करून दिली.

कोरोनाच्या काळात सर्वांनी काळ्जी घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच आपल्या खास शैलीत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावेळी व्यासपीठावर अकोले विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार वैभवराव पिचड, डॉ. अशोक इथापे, अशोकराव कानवडे, सीताराम भांगरे, साहेबराव वलवे, शैलेश फटांगरे, दिलीप कोल्हे, प्रमोद डुबे, योगेश डुबे, संजय पावसे, गणेश शेटे,  भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post