नगर : कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने विकेंड पाळण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी फक्त छोटे व्यावसायिकांना केली. मोठे व्यवसाय राजरोज सुरु होते.
रविवारी सायंकाळी सात नंतर शहरासह राज्य महामार्गावरील हॉटेल व उपहारगृहांमध्ये झगमगाट दिसू येत होता. दुचाकीसह चारचाकी वाहनांची रेलचेल दुकांसमोर दिसून येत होती.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतापासूनच खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरवात करण्यात आलेली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याला विकेंड करण्यात आलेले आहे. या विकेंडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याबाबत सूचित केलेले आहे.
हॉटेल व्यवसायिकांना पार्सल देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र शनिवारी रात्री व रविवारी रात्री शहरासह राज्य महामार्गावरील काही हॉटेलमध्ये झगमगाट दिसून येत होता.
नेहमी प्रमाणेच हॉटेल समोर दुचाकी व चारचाकी वाहनांची गर्दी दिसून येत होती. हे चित्र पाहिल्यानंतर विकेंड नेमके कोणासाठी होते, असा प्रश्न आता कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना सतावत होता.
या विकेंडमध्ये छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य केले. मात्र काही मोठ्या व्यावसायिकांचे दुकाने पुढून बंद मागच्या दाराने सुरु होते.
प्रशासनाकडून अशा व्यावसायिकांवर शनिवारी कारवाई न झाल्याने मागच्या दाराने व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचा संख्या वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती.
Post a Comment