एम. व्ही. देशमुख
नगर : अंधश्रध्दा पसरविणे गुन्हा आहे. पण कोरोनामुळे अनेकजण सध्या अंधश्रध्देला बळी पडत असल्याचे चित्र खासगीसह निमशासकीय कार्यालयांमध्ये दिसून येत आहे. आपल्या नोकर्या टिकवण्यासाठी यासाठी काहींनी तोडगे करण्याचे उद्योग सुरु झाल्याची चर्चा आता खासगी कंपन्यांमधील कर्मचारी यामध्ये सुरु आहे.
21 व्या शतकात पदारपण केलेले असले तरी आजूनही समाजातील काहींच्या मानगुटीवर अंधश्रध्देचे भूत उतरलेले नाही. अद्यापही अनेकजण आमवशा व पौर्णिमेला तोडगे करून रस्त्यावर टाकत आहे.
अनेकजण अमावशेला काळीबाहुली व लिंबू मिरची खरेदी, लाल व काळ्या दोर्यात गुंडाळलेले कोवळे, नजर बाहुली असे साहित्य खरेदी करीत आहेत. हे अंधश्रध्देतून प्रकार घडत आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समिती समाजातील काहींच्या वेळी
डोक्यावरील भूत उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु अशा घटना घडत आहेत. जोपर्यंत समाजातून अंधश्रध्देचे भूत उतरत नाही. तोपर्यंत अंधश्रध्दा पसरविण्याच्या घटना घडत राहणार आहे.
कोरोनाने सगळीकडे हाहाकार केलेला आहे. यामुळे सगळ्यांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. ही घडी बसविण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहे. पहिल्या लाटे नंतर दुसरी व दुसर्या लाटे नंतर तिसरी लाट येत आहे.
पहिल्या लाटेत अनेकांच्या नोकर्या गेलेल्या आहेत. काहींच्या दुसर्या लाटेत गेलेल्या असून काहीजण वेटिंगवर आहेत. अशांनी आपल्या नोकर्या टिकाव्यात यासाठी देवांना साकडे घालण्यास सुरवात केली.
काहींनी यासाठी देवलसी पाहून काळे व पिवळे धागे घेऊन कार्यालय परिसरात आणून टाकण्यास सुरवात केलेली असून काळे पिवळे दोरे खासगी कार्यालयांमध्ये आढळत आहे, असे खासगी कार्यालयांची सफाई रांगांमध्ये चर्चा सुरू आहे.
कोरोनामुळे सुसिक्षितही आता अंधश्रध्देचे बळी ठरत आहेत. ही अंधश्रध्दा कमी होणे गरजेचे आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Post a Comment