पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत मधील टायर दुकानदारांना टायरचा मी डीलर आहे. असे सांगुन त्यांचे कडून टायरची वॉर्डार करीता पैसे अकाउंटला मागून घेत असे आणि त्यांना टायर न देता मिळालेले पैसे फसवणूक करून स्वतः कडे ठेवत असे.
कर्जत मधील टायर दुकानदारास ६,८३,000 रू ची फसवणूक केली. त्या संदर्भात जानेवारी महिन्यात कर्जत पोलीस ठाण्यात भादवि कलम ४२०,४०६ प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती
त्यानुसार पोलीसांनी तपास सुरु केला परंतु आरोपी गणेश कांताराव पिंगळकर हा पुणे तसेच मुबई फिरून पोलिसांना चकवा देत होता.
पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध चालूच होता. आरोपी हा त्याचे मूळ गावी हिंगोली जिल्हा तेथे असल्याची माहिती मिळताच पथक पाठवून आरोपी गणेश कांतरव पिंगळकर यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केला.
या गुन्ह्यात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. सुरेश माने करत आहेत. अटक आरोपीवर फसवणुकीचे ६ गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे यांनी केली
Post a Comment