माजी नगरसेविकेच्या पतीला धमकी


नगर : माजी नरसेविका सारिका भूतकर यांचे पती हनुमंत भूतकर यांना चार जणांनी तलाव दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. 

ही घटना नगर शहरातील धर्माधिकारी मुळा (सावेडी) येथील भूतकर यांच्या घरासमोर गुरुवारी रात्री दहा वाजता घडली.

याबाबत हनुमंत भूतकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हनुमंत भूतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी (ता. एक)ला रात्री दहा वाजता घरात आमर करीत असताना विकी उर्फ सूरज राजू कांबळे (रा. भूतकरवाडी शाळेजवळ) व अनिल घोेरपडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भिंगारदिवे मळा, भूतकरवाडी) व दोन अनोळखी इसमांनी आमच्या घरासमोर उभे राहून मागील भांडणाच्या कारणावरून तुम्ही आमच्यावर केस करता का असे म्हणून शिविगाळ केली.

तसेच मला तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post