अमर छत्तीसे
आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव एकेकाळी देशपातळीवरील गेले होते. पण मध्यंतरी च्या काळात जुने अनुभवी अधिकारी बदलून गेले. त्याबरोबरच आरोग्य केंद्राचा लौकीकही बदलत गेला आहे. येथील कार्यपध्दतीच बदलली आहे, अशी चर्चा सध्या कर्मचारी यामध्ये सुरु आहे.
आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मयत व्यक्तीची कोरोना चाचणी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यावरून आरोग्य खात्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रकार अनावधावनाने झाला की लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ती करण्यासाठी मयताचे नाव यादीत टाकण्यात आले असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणाची आता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे. मात्र तेव्हढ्या गांभिर्याने या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान याबाबत तालुक्यातील एका अधिकार्याशी संपर्क साधला असता याबाबत संबंधितांकडून खुलासा मागविण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकराची नोंद नेमकी कधी झाली? कोणाची नोंद झाली? याचा उलगडा मात्र संबंधितांना होत नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत एका कार्यकर्त्याने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.
Post a Comment