बाधितांच्या आकड्यात पारनेरची आघाडी कायम.. पाथर्डी, श्रीगोंदा व नेवाशात चिंता कायम


नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. शुक्रवारपासून बाधितांचा आकडा कमी होत आहे.  आज (शनिवारी) बाधितांचा आकडा कमी आहे. 

जिल्ह्यात आज गुरुवारी 406 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 152  तर अँटीजेन चाचणीत 236 असे एकूण 406 कोरोना बाधित आढळून आले. 

पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 54 जण बाधित आढळून आलेले आहेत. कालच्या पेक्षा आज तालुक्यातील बाधितांची संख्या कमी असली तरी जिल्ह्यातील आघाडी कायम आहे. पाथर्डी व श्रीगोंदा तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. पाथर्डी व श्रीगोंद्यात प्रत्येकी 36 बाधित आढळून आलेले आहेत.  

गेल्या काही दिवस पारनेरने कोरोनाच्या आकड्यात पहिले स्थान जिल्ह्यात मिळविले होते. गुरुवारी आकडा कमी झाला होता. मात्र पारनेरने आजही जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. 

नेवासा तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली असून तिसरे स्थान मिळविले आहे. नेवाशात आज दिवस भरात 35 बाधित आढळले आहेत.

नगर शहरात गुरुवारी 12 जण बाधित आढळले होते. कालच्या तुलनेत शहरातील बाधितात चारने घट झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज जिल्ह्यात बाधितांचा आकडा 66 ने घटला   आहे. 

बाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post