नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा कमी व जास्त होत आहे. बुधवारी बाधितांचा आकडा कमी झालेली होता. आज (शुक्रवारी) बाधितांचा आकडा कमी आहे.
जिल्ह्यात आज गुरुवारी 472 बाधित आढळून आलेले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात नऊ, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 195, तर अँटीजेन चाचणीत 268 असे एकूण 472 कोरोना बाधित आढळून आले.
पारनेर तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली. पारनेरमध्ये 74 जण बाधित आढळून आलेले आहेत. पाथर्डी तालुका सध्या जिल्ह्यात दोन नंबरला आहे. पाथर्डीमध्ये आज 60 बाधित आढळून आलेले आहेत.
गेल्या काही दिवस पारनेरने कोरोनाच्या आकड्यात पहिले स्थान जिल्ह्यात मिळविले होते. गुरुवारी आकडा कमी झाला होता. मात्र पारनेरने आज जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. संगमनेरमध्ये 57 जण बाधित सापडलेले आहेत.
नगर शहरात गुरुवारी 16 जण बाधित आढळले होते. त्यात आज वाढ झालेली आहे. शहरात आज शुक्रवारी एकूण 21 जण बाधित आढळले आहेत.
गुरवारच्या तुलनेत आज जिल्ह्यात बाधितांचा आकडा 15 ने घटला आहे.
बाधितांचा आकडा कमी जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Post a Comment