निघोज गाव टॅंकरमुक्तीची संकल्पना पूर्ण करण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था


निघोज ः
निघोज गाव व परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब लंके ठेकेदार बाबाशेठ लंके व प्रगतीशील शेतकरी पोपटराव लंके यांच्या विहिरीवरुन नवीन पाईपलाईन नळपाणी पुरवठा योजनेला जोडण्यात आली आहे. यामुळे गावातील पाणी टंचाई दूर होणार आहे. टॅंकरमुक्तीची संकल्पना पूर्णत्वास येणार असल्याची माहिती सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील व उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे यांनी दिली आहे.

नवीन पाईपलाईन खर्च संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनने दिला असल्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी दिली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निघोज व परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने दोन ते अडीच महिने नळपाणी पुरवठा योजना ठप्प होत असे.गावची लोकवस्ती पंचवीस हजाराच्या आसपास आहे. तशातच वाडीवस्तीवर सुद्धा या नळपाणी पुरवठा योजनेचा फायदा जनतेला होत आहे.

यावर्षी मात्र पाण्याचे चांगले नियोजन केल्याने मे महिन्यात गेली आठ ते पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. दरवर्षी सामाजिक संस्था टॅंकरच्या माध्यमातून पाणीवाटप करुन जनतेला दिलासा देण्याचे काम करीत असतात. यावर्षी मात्र संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील वराळ यांनी टॅंकरच्या माध्यमातून गावच्या विहिरीत पाणी टाकून ते पाणी नळपाणी पुरवठा योजनेतून सोडण्यापेक्षा टॅंकरचा नाहक खर्च दरवर्षी करण्यापेक्षा गाव व परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन करीत नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी पाणी उपलब्ध करण्याचे आवाहन केले.

रामभाऊ वराळ व अप्पासाहेब वराळ या बंधूंनी आपल्या शेतातील मालाला पाणी न देता हे पाणी गावच्या विहिरीसाठी उपलब्ध करून दिले. त्यानंतर बाहेरील बारव स्वच्छ करण्याचा निर्णय सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील यांनी घेतला. स्वतः तेथे उभे राहून संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन सदस्यांनी मदत करीत ही बारव साफ केली  हे पाणी सुद्धा विहिरीत घेतले गेले. मात्र लोकवस्ती मोठी असल्याने व कडक उन्हाळा असल्याने पाणीटंचाई समस्या वाढत गेली.

प्रगतीशील शेतकरी भाऊसाहेब लंके त्यांचे चिरंजीव ठेकेदार बाबाशेठ लंके, प्रगतशिल शेतकरी पोपटराव लंके यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी आपल्या विहिरीचे पाणी गावासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे अल्पसंख्याक समाजाचे नेते जाकीरभाई तांबोळी  पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे यांच्याशी चर्चा केली. या सर्वांनीच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याबरोबर चर्चा केली.

त्यानंतर वराळ यांनी विहिर व त्यावरील खंडोबा पाउतके शेतीजवळ आलेल्या पाईपलाईनची पाहणी केली. ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांच्याशी चर्चा केली. मात्र सध्या घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण कमी आहे. इतर खर्चासाठी पैसे उपलब्ध नाहीत. हा खर्च ग्रामपंचायत माध्यमातून करणे शक्य नाही, अशी माहिती ग्रामसेवक वाळके यांनी दिली.

पाईपलाईनला 80 हजार रुपये खर्च येणार आहे. करायचे काय असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र आपल्याला गाव टॅंकरमुक्तीची संकल्पना पूर्ण करायची असल्याने पाइपलाइन करणे आवश्यक असल्याचे सरपंच वराळ व उपसरपंच वरखडे यांनी सांगितले. लगेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन माध्यमातून आम्ही हा खर्च करु असा शब्द फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना दिला.

लगेच काम सुरू केले. 16 मेला या पाईपलाईनचे पाणी नळपाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब लंके, ठेकेदार बाबाशेठ लंके व प्रगतीशील शेतकरी पोपटराव लंके यांच्या विहिरीला भरपूर पाणी असल्याने तसेच त्यांनी पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले आहेत.

या पाईपलाईनचा खर्च संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून केल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले की, गेली कित्येक वर्षांपासून पाणीटंचाई वर टॅंकर हा पर्याय सुरु होता मात्र ग्रामपंचायतने पुढाकार घेउन टॅंकरमुक्तीची संकल्पना मांडली आहे. यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने यापुढे टॅंकरमुक्त गाव योजनेसाठी सातत्याने पुढाकार घेऊन यापुढील काळात गाव टॅंकरमुक्त करणार असल्याची ग्वाही वराळ पाटील यांनी दिली आहे.

गाव व परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउली वरखडे, ग्रामसेवक दत्तात्रय वाळके, ग्रामपंचायत सदस्य, पाणीपुरवठा योजना व्यवस्थपक संतोष गायखे व त्यांचे सहकारी यांनी चांगले नियोजन केले. दरवर्षी उन्हाळ्यातील दिवसांमध्ये पन्नास ते साठ दिवस पाणी उपलब्ध होत नाही. यावर्षी मात्र फक्त आठ ते दहा दिवस पाणीटंचाई जाणवली याबद्दल जनतेतून संबंधीतांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.

कुकडी डावा कालव्याचे पाणी नऊ मे दरम्यान सोडण्यात येणार होते. मात्र या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाल्याने पाणी कधी सुटणार हा प्रश्न भेडसावत आहे. मात्र हेच पाणी नऊ मेला सोडण्यात आले असतें तर निघोज सहीत बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता. कुकडी नदीवर बहुतांश गावच्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित असल्याने या कुकडी पट्ट्यातील बहुतांश गावांत पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post