मढी देवस्थानकडून माजी आमदार राजीव राजळे कोविड केअर सेंटरला वैद्यकीय साहित्य अन् फळे भेट


पाथर्डी ः
माजी आमदार राजीव राजळे कोविड केअर सेंटरला श्री कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी यांच्याकडून सेनिटायझर व मास्क आदी साहित्य भेट देण्यात आले.

पाथर्डी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांच्याकडून पाणी बॉक्स, पाथर्डीतील कोविड योध्दा सन्मान ग्रुप यांच्याकडून औषधे व सेनिटायझर,खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधू साठे यांच्याकडून बिस्कीट, पाण्याचे बॉक्स देण्यात आले.

भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशिताई गोल्हार यांच्याकडून फळे व बिस्कीट देण्यात आले. यावेळी मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, विश्वस्त रविंद्र आरोळे, बबनराव मरकड, मढी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अशोक पवार, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे, रमेश हंडाळ,मंगल कोकाटे, भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती मंत्री, अशोक मंत्री, कोविड सेंटरच्या डॉ. शीतल वायकर आदी उपस्थित हाेते.

साहित्य वाटपानंतर कोविडकेअर सेंटरमधील रुग्णांनी समाधान व्यक्त केले. या काेविड सेंटरला नागरिकांकडून मदतीचा आेघ सुरु आहे. त्यामुळे येथे सुविधा चांगल्या मिळत आहेत. त्यामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post