सचिन पाटील
नगर : तसे ते दोन्ही नेते एकाच मित्र असून अनेक वर्ष एकाच पक्षात राहून विरोधकांना सळोकी पळो त्यांनी तालुक्यात केले होते. मात्र त्यातील एका नेत्याला अतंर्गत राजकारणाचा फटका बसल्याने त्यांनी दुसर्या पक्षात प्रवेश करून आपले तालुक्यात वजन दाखवून दिले असले तरी त्यांचे पूर्वीच्या पक्षात मात्र नेत्यांबरोबर अबाधित ठेवले. हे संबंध त्यांच्याच वाढदिवसाला विरोधी पक्षाच्या नेत्याने शुभेच्छा दिल्याने तालुक्यात राजकीय वादळ उठले असून तर्कवितर्क लढविले जात आहे.
कर्जत तालुक्यातील सध्या भाजप व राष्ट्रवादी संघर्ष सुरु आहे. भाजपाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर आरोप केले जात आहे. त्याला सडेतोड उत्तरे राष्ट्रवादीवर केले जात आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी विधासभा निवडणुकीपासून सुरु आहेत.
यामध्ये नेत्यांसह कार्यकर्तेही सहभागी होत असून यापुढेही हा प्रकार सुरुच राहणार आहे.
या सगळ्या गोंधळाच्या परिस्थिती पूर्वीच एकाच पक्षात असलेल्या तालुक्यातील दोन नेत्यांची मैत्री तालुक्याला परिचित होती. मात्र त्यातील एक नेत्याने कालांतराने भाजपाला सोडून राष्ट्रवादी जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून विविध पदे मिळाली असून त्यांनी ते विरोधकांना दाखवून दिले आहे.
त्यांचाच नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाला भाजपाच्या एका नेत्याने सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपाच्या नेत्याने पक्षाचे चिन्ह वापरून दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरत आहे.
यावरून तालुक्यात आता चांगली चर्चा सुरु झाली असून पक्ष बदलाचे वारे तर वाहत नाही ना? असा प्रश्नही काहींकडून उपस्थित केला जात आहे. या शुभेच्छा तालुक्यात चर्चेचे वादळ उठविणार्या ठरल्या आहेत.
Post a Comment